wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


उत्पत्ति धडा 25
  • 1 अब्राहामाने पुन्हा लग्न केले, त्याच्या दुसऱ्या बायकोचे नाव कटूरा होते.
  • 2 कटुरेला जिब्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शुह ही मुले झाली;
  • 3 यक्षानास शबा व ददान ही दोन मुले होती; अश्शूरी व लऊमी लदूशी लोक हे ददानाचे वंशज होते;
  • 4 एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे मुलगे होते; ही सर्व मुले अब्राहामापासून कटूरेला झाली.
  • 5 मरण्यापूर्वी अब्राहामाने आपल्या गुलाम स्त्रियांच्या मुलांसाठी काही देणग्या दिल्या; त्याने या मुलांना इसहाकापासून वेगळे करुन दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले; नंतर त्याने आपली सगळी मालमत्ता इसहाकाला दिली.
  • 6
  • 7 अब्राहाम एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला;
  • 8 त्याला दीर्घकाळ सुखी व समाधानी जीवन लाभले; मग तो अशक्त होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला;
  • 9 इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्याला सोहराचा मुलगा एप्रोन हित्ती याच्या मम्रेच्या पूर्वेकडे असलेल्या शेतातील मकपेला गुहेत सारेच्या जवळ पुरले;
  • 10 अब्राहामाने हित्ती लोकांकडून विकत घेतलेली हीच ती गुहा.
  • 11 अब्राहामाच्या मृत्यूनंतर परमेश्वराने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि त्यानंतर ही इसहाक बैर - लहाय - रोई येथेच राहू लागला.
  • 12 अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची ही वंशावळ;
  • 13 इश्माएलाच्या मुलांची नावे अशी. नबायाथ हा त्याचा पहिला मुलगा; नंतर केदार जन्मला, मग अदबील, मिबसाम,
  • 14 मिश्मा, दुमा, मस्सा,
  • 15 हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा;
  • 16 अशी इश्माएलाच्या पुत्रांची नावे होती; प्रत्येक मुलाच्या परिवार गटाचा एक तळ होता; पुढे त्याचेच एक गांव बनले; हे बारा पुत्र आपापल्या लोकासहीत बारा वंशाचे संस्थापक सरदार झाले.
  • 17 इश्माएल एकशें सदतीस वर्षे जगला नंतर तो मेला आणि आपल्या पूर्वजांमध्ये गोळा झाला;
  • 18 त्याचे वंशज सर्व वाळवंट भागात तळ देत राहिले; हा भाग मिसर जवळील हवीलापासून शूरपर्यंत आहे आणि तो शूरपासून पार अश्शूरपर्यंत जातो. अश्शूर इश्माएलाचे वंशज अधूनमधून आपल्याच भाऊबंदावर हल्ला करीत असत.
  • 19 इसहाकाची घराणी अशी अब्राहामाला इसहाक नावाचा मुलगा होता.
  • 20 तो चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन अराम येथील अरामी बथुवेलाची कन्या व लाबान याची बहीण रिबका इजशी लग्न केले.
  • 21 इसहाकाच्या बायकोला मूलबाळ होईना म्हणून इसहाकाने रिबकेसाठी परमेश्वराची प्रार्थना केली; परमेश्वराने इसहाकाची प्रार्थना ऐकली आणि रिबका गर्भवती झाली.
  • 22 ती गरोदर असताना तिच्या उदरातील दोन मुले एकमेकांशी झगडू लागली; तेव्हा परमेश्वराची प्रार्थना करुन ती म्हणाली, “परमेश्वरा, मला हे असे का होत आहे?”
  • 23 परमेश्वर तिला म्हणाला, “दोन राष्ट्राचे राज्यकर्ते तुझ्या उदरातून जन्म घेतील; एक मुलगा दुसऱ्यापेक्षा बलवान होईल; वडील मुलगा धाकट्याची सेवा करील.”
  • 24 मग रिबकेची प्रसूतीची वेळ आली तेव्हा तिला जुळी मुले झाली;
  • 25 पहिला मुलगा तांबूस रंगाचा होता, त्याचे अंग जणूकाय केसाळ झग्यासारखे होते; म्हणून त्याचे नाव एसाव (म्हणजे केसाळ) असे ठेवले.
  • 26 पाठोपाठ दुसरा मुलगा जन्मला तेव्हा त्याने एसावाची टाच हाताने घट्ट धरली होती; म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. रिबकेला ही जुळी मुले झाली तेव्हा इसाहक साठ वर्षांचा होता.
  • 27 ही जुळी मुले वाढत जाऊन मोठी झाली तेव्हा एसाव तरबेज शिकारी झाला; शेताशेतातून व रानावनातून फिरण्याची त्याला आवड होती. पण याकोब शांत होता तो त्याच्या तंबूत राहिला.
  • 28 एसाव इसहाकाचा आवडता होता; त्याने शिकार करुन आणलेल्या प्राण्यांचे मांस खाणे इसहाकाला आवडत असे; परंतु याकोब रिबकेचा आवडता होता.
  • 29 एके दिवशी एसाव शिकारीहून परत आला; तो फार थकलेला होता व भुकेने अगदी गळून गेला होता. याकोब मसुरीच्या लाल डाळीचे वरण शिजवीत होता.
  • 30 तेव्हा एसाव याकोबाला म्हणला, “मी भुकेने व्याकूळ झालो आहे तर मला थोडे तांबड्या डाळीचे वरण खावयास घेऊ दे;” यावरुन लोक त्याला अदोम (म्हणजे तांबडा) म्हणत.
  • 31 परंतु याकोब म्हणाला, “त्याबद्दल तू मला आजच तुझा ज्येष्ठपणाचा हक्क दिला पाहिजेस.”
  • 32 एसाव म्हणाला, “भुकेने माझा प्राण चालला आहे, मी जर मेलो तर माझ्या बापाची मालमत्ता मला काय उपयोगाची? तेव्हा मी माझ्या ज्येष्टपणाचा हक्क तुला देतो.”
  • 33 परंतु याकोब म्हणाला, “तर प्रथम, तू तुझा ज्येष्ठपणाचा वारसा हक्क मला देशील अशी शपथ माझ्याशी वाहा.” तेव्हा एसावाने तशी शपथ वाहिली; अशा रीतीने एसावाने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या सगळ्या मालमत्तेचा व ज्येष्टपणाचा आपला वारसा हक्क आपला धाकटा भाऊ याकोब याला मोबदला म्हणून दिला.
  • 34 मग याकोबाने त्याला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. एसावाने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर तो तेथून निघून गेला. अशा रीतीने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या ज्येष्ठपणाच्या हक्काची एसावाने बेपर्वाईने कदर केली नाहीं.