wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यिर्मया धडा 41
  • 1 सातव्या महिन्यात नथन्याचा मुलगा इश्माएल हा अहीकामचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे आला. नथन्या हा अलीशामाचा मुलगा होता. इश्माएल त्याच्याबरोबर त्याच्या दहा माणसांना घेऊन आला. ते सर्वजण मिस्पाला आले. इश्माएल राजघराण्यातील होता. यहूदाच्या राजाच्या अधिकाऱ्यांपैकी तो एक होता इश्माएल व त्याच्या बरोबरची माणसे गदल्याबरोबर जेवावयास बसली.
  • 2 ते जेवत असतानाच, इश्माएल व त्याची दहा माणसे उठली व त्यांनी अहीकामाचा मुलगा गदल्या ह्यास तलवारीने ठार मारले. बाबेलच्या राजाने यहूदाचा राज्यपाल म्हणून गदल्याची निवड केली होती.
  • 3 गदल्याबरोबर मिस्पा येथे असलेल्या सर्व यहुद्यांनासुद्धा इश्माएलने ठार मारले. एवढेच नाही तर, गदल्याबरोबर असलेल्या खास्दी सैनिकांनासुद्धा त्याने ठार केले.
  • 4 गदल्याला मारल्याच्या दुसऱ्या दिवशी 80 लोक मिस्पाला आले ते परमेश्वराच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी धान्य व धूप आणीत होते. त्या सर्वांनी दाढ्या कापलेल्या होत्या अंगावर जखमा केलेल्या होत्या त्यांचे कपडे फाटलेले होते, त्यांनी मुंडन केले होते.ते शखेम, शिलो व शोमरोन येथून आले होते. त्यातील कोणालाही गदल्याच्या वधाविषयी माहिती नव्हती.
  • 5
  • 6 इश्माएलने मिस्पा सोडले व तो त्या माणसांना भेटायला गेला. तो त्यांना भेटायला जाताना रडला.तो त्या माणसांना म्हणाला, “अहीकामचा मुलगा गदल्या ह्याला भेटण्यास माझ्याबरोबर चला.”
  • 7 ती 80 माणसे मिस्पाला गेली. इश्माएलने व त्याच्या माणसांनी त्यातील 70 जणांना मारले. आणि त्यांची प्रेते खूप खोल असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकली.
  • 8 पण राहिलेली दहा माणसे इश्माएलला म्हणाली, “आम्हाला मारु नको. आमच्याजवळ गहू व सातू आहेत. तसेच तेल व मधही आहे आम्ही ह्या गोष्टी शेतात लपवून ठेवल्या आहे.” म्हणून इश्माएलने ह्या दहा माणसांना सोडले. इतरांसारखे त्यांना मारले नाही.
  • 9 (ती पाण्याची टाकी खूप मोठी होती. ती यहूदाचा राजा आसा याने, युद्धाच्या वेळी नगराला पाणी मिळावे म्हणून बांधली होती.इस्राएलचा राजा बाश ह्याच्यापासून आपल्या नगराचा बचाव करण्यासाठी आसाने असे केले होते. ती टाकी भरुन जाईपर्यंत इश्माएलने त्यात प्रेते टाकली.
  • 10 मिस्पामधील इतर सर्व लोकांना इश्माएलने पकडले ह्या लोकांत राजाच्या मुली व इतर मागे राहिलेले लोक होते. हे लोक म्हणजे नबूजरदानने गदल्याला ज्या लोकांवर लक्ष ठेवण्यास नेमले होते, तेच होते नबूजर दान हा बाबेलच्या राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख होता. इश्माएलने त्या सर्व लोकांना कैद केले व तो अम्मोनी लोकांचा देश पार करुन जाण्यास निघाला.
  • 11 त्याच्याबरोबर असलेल्या कारेहचा मुलगा योहानानला व इतर सैन्याधिकाऱ्याना त्याने केलेली दुष्कृत्ये कळली.
  • 12 म्हणून योहानान व इतर सैन्याधिकारी आपल्या लोकांना घेऊन नथल्याचा मुलगा इश्माएल ह्याच्याशी इश्माएलला पकडले.
  • 13 इश्माएलने ज्यांना कैद करुन नेले होते, त्या कैद्यांनी योहानानला व सैन्याधिकाऱ्यांना पाहिले. त्यांना मग खूप आनंद झाला.
  • 14 नंतर इश्माएलने पकडलेले सर्व लोक मिस्पा येथून कारेहचा मुलगा योहानान ह्याच्याकडे धावले.
  • 15 पण इश्माएल व त्याची आठ माणसे योहानानच्या हातातून निसटली. ते अम्मोनच्या लोकांकडे पळाले.
  • 16 मग कारेहचा मुलगा योहानान व इतर सर्व सैन्याधिकारी यांनी सर्व कैद्यांना सोडविले. गदल्याला ठार मारल्यानंतर इश्माएलने ह्या लोकांना मिस्पा येथून आणले होते. त्या वाचलेल्या लोकांत सैनिक, स्त्रिया, मुले व दरबारातील अधिकारी होते. योहानानने त्यांना गिबोनमधून परत आणले.
  • 17 योहानान व इतर सैन्याधिकारी खास्द्यांना भीत होते. बाबेलच्या राजाने गदल्याला यहूदाचा राज्यपाल म्हणून निवडले होते. पण इश्माएलने गदल्याचा खून केला, म्हणून खास्दी रागावले असतील अशी भीती योहानानला वाटत होती. म्हणून त्यांनी मिसरला पळून जाण्याचे ठरविले मिसरच्या वाटेवर ते गेरुथ किम्हाम येथे राहिले. गेरुथ किम्हाम बेथलेहेमनजीक आहे.
  • 18