- 1 वाईट माणूस जेव्हा असे म्हणतो “मी देवाला भिणार नाही, त्याला मान देणार नाही” तेव्हा तो फार वाईट गोष्ट करतो.
- 2 तो माणूस स्वतशीच खोटे बोलतो त्याला स्वतच्या चुका दिसत नाहीत म्हणून तो क्षमेची याचना करीत नाही.
- 3 त्याचे शब्द खोटे असतात त्यांना कवडीची किंमत असते तो शहाणा होत नाही किंवा सत्कृत्य करायला शिकत नाही.
- 4 सर्व रात्रभर तो चुकीच्या किंवा वाईट गोष्टींच्या योजना आखतो. तो उठल्यावर काहीही चांगले करीत नाही. परंतु तो काही वाईट करायला नकारही देत नाही.
- 5 परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे. तुझी इमानदारी ढगांपेक्षा उंच आहे.
- 6 परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे. परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस.
- 7 तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यांत किंमती आहे. माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात.
- 8 परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो. तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस.
- 9 परमेश्वरा जीवनाचे कारंजे तुझ्यातून उडते. तुझा प्रकाश आम्हाला प्रकाश दाखवतो.
- 10 परमेश्वरा जे तुला खरोखरच ओळखतात त्यांच्यावर प्रेम करणे तू चालूच ठेव. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी तुझा चांगुलपणा असू दे.
- 11 परमेश्वरा गर्विष्ठ लोकांना मला सापळ्यात अडकवू देऊ नकोस. वाईट लोकांना मला पकडू देऊ नकोस.
- 12 त्याच्यां थडग्यावर “हथे वाईट लोक पडले, त्यांना चिरडण्यात आले, ते आता पुन्हा कधीही उभे राहू शकणार नाहीत.” असे लिहून ठेव.
Psalms 036
- Details
- Parent Category: Old Testament
- Category: Psalms
स्तोत्रसंहिता धडा 36