wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


स्तोत्रसंहिता धडा 37
  • 1 तू दुष्टांवर चिडू नकोस. वाईट कर्म करणाऱ्यांचा हेवा करु नकोस.
  • 2 वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या आणि मरुन जाणाऱ्या गवतासारखे व हिरव्या वनस्पती सारखे असतात.
  • 3 तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील.
  • 4 परमेश्वराची आनंदाने सेवा कर म्हणजे तो तुला जे काही हवे ते आनंदाने देईल.
  • 5 परमेश्वरावर अवलंबून राहा. त्याच्यावर विश्वास ठेव. आणि तो जे करणे आवश्यक असेल ते करेल.
  • 6 परमेश्वर तुझा चांगुलपणा आणि न्यायीपणा दुपारच्या उन्हासारखा तळपू देईल.
  • 7 परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पाहा दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नको सदुष्ट लोक कुकर्म करण्याच्या योजना आखतील आणि त्यात यशस्वी होतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस.
  • 8 रागावू नकोस, संताप करुन घेऊ नकोस. तुला स्व:तला दुष्कर्म करावेसे वाटेल इतका संतापू नकोस.
  • 9 का? कारण दुष्टांचा नाश होणार आहे. परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात त्यांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
  • 10 थोड्याच काळानंतर इथे दुष्ट लोक राहाणार नाहीत. तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न करु शकतोस पण ते निघून गेलेले असतील.
  • 11 विनम्र लोकांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल. आणि ते शांती व समाधानात जगतील.
  • 12 दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुध्द वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात. दुष्ट लोक चांगल्या माणसांसमोर आपल्या रागाचे प्रदर्शन दात ओठ खाऊन करतात.
  • 13 परंतु आपला देव त्या दुष्टांना हसतो. त्यांचे काय होणार आहे ते त्याला माहीत आहे.
  • 14 दुष्ट लोक त्यांचे धनुष्य बाण घेऊन सरसावतात. त्यांना गरीब, लाचार लोकांना मारायचे आहे.
  • 15 परंतु त्यांचे धनुष्य मोडेल व त्यांच्या तलवारी त्यांच्याच छातीत घुसतील.
  • 16 मूठभर चांगले लोक वाईटांच्या जमावापेक्षा चांगले असतात.
  • 17 का? कारण दुष्टांचा नाश होईल आणि परमेश्वर चांगल्यांची काळजी घेईउ
  • 18 परमेश्वर शुध्द माणसांचे आयुष्यभर रक्षण करतो त्यांचे वतन सदैव त्याच्याजवळ राहाते.
  • 19 संकटाच्यावेळी चागल्या माणसांचा नाश होणार नाही. भुकेच्या वेळा येतील तेव्हा त्यांच्याकडे खायला भरपूर अन्न असेल.
  • 20 वाईट माणसे परमेश्वराचे शत्रू आहेत आणि त्या माणसांचा नाश होणार आहे त्यांच्या दऱ्या कोरड्या पडतील आणि जळून जातील. त्यांचा संपूर्ण नाश होईल.
  • 21 वाईट माणूस पैसे चटक्‌न उसने घेतो आणि कधीही परत करीत नाही. परंतु चांगला माणूस उदारहस्ते इतरांना देतो.
  • 22 जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल परंतु जर त्याने त्यांच्या वाईटाची इच्छाप्रकट केली तर त्यांचा नाश होईल.
  • 23 परमेश्वर सैनिकाला सावधगिरीने चालण्यास मदत करतो. परमेश्वर त्याला पडण्यापासून सावरतो.
  • 24 जर सैनिक पळत पळत त्याच्या शत्रूवर चढाई करत असेल तर परमेश्वर त्याचा हात धरुन त्याला पडताना सावरतो.
  • 25 मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे. आणि देवाने चांगल्या माणसांचा त्याग केल्याचे मी कधी पाहिले नाही चांगल्या माणसांची मुले अन्नासाठी भीक मागताना मी कधी पाहिली नाहीत.
  • 26 चांगला माणूस दुसऱ्यांना सढळ हाताने देतो आणि चांगल्या माणसाची मुले म्हणजे जणू ईश्वरी कृपाच असते.
  • 27 जर तू वाईट गोष्टी करायला नकार दिलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू सर्वकाळ जगशील.
  • 28 परमेश्वराला न्याय आवडतो. तो त्याच्या भक्तांना मदत केल्याशिवाय राहात नाही. तो त्याच्या भक्तांचे नेहमी रक्षण करेल पण दुष्टांचे निर्दालन करेल.
  • 29 चांगल्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल ते सतैव त्या जमिनीवर राहातील.
  • 30 चांगला माणूस चांगला उपदेश करतो आणि त्याचे निर्णय सर्वासाठी योग्य असतात.
  • 31 परमेश्वराची शिकवण त्याच्या (मनात) ह्रदयात असते. तो योग्य मार्गाने जगण्यांचे सोडून देत नाही.
  • 32 परंतु दुष्ट लोक चांगल्यांना दु:खी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतात ते चांगल्यांना मारण्याचा प्रयत्न करतात.
  • 33 परंतु परमेश्वर त्यांना तसे करु देत नाही. तो चांगल्यांना दोषी ठरवू देणार नाही.
  • 34 परमेश्वर सांगतो तसे करा परमेश्वराच्या मदतीची वाट पाहा. त्याला अनुसरा दुष्टांचा नाश होईल, परंतु परमेश्वर तुम्हाला महत्व देईल आणि देवाने कबूल केलेली जमीन तुम्हाला मिळेल.
  • 35 मी फोफावलेल्या सशक्त झाडासारखा दुष्टमाणूस पाहिला होता.
  • 36 परंतु नंतर तो नाहीसा झाला, मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही.
  • 37 शुध्द आणि सत्यवादी राहा शांती करणाऱ्यांना खूप संतती लाभेल.
  • 38 परंतु जे लोक नियम पाळत नाहीत त्यांचा नाश होईल. आणि त्यांच्या संततीला देश सोडून जाणे भाग पडेल.
  • 39 परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो.
  • 40 परमेश्वर चांगल्या माणसांना मदत करतो आणि त्यांना तारतो चांगले लोक परमेश्वरावर अवलंबून असतात आणि तो त्यांचे वाईट लोकांपासून रक्षण करतो.